जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर, नागपूर

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू झालेल्या संस्थासाठी बांधकाम व साहित्य खरेदी यासाठी केंद्र शासनाकडुन अनुदान दिले जाते. या संस्थानमधील कर्मचा-याचे वेतन व कार्यक्रम यावरील खर्च प्रथम राज्य शासनाने करणे अपेक्षित आहे. या खर्चाची प्रतीपूर्ती नंतर केंद्र शासनाकडुन केली जाते. नवव्या पंचवार्षिक योजनेअखेरपर्यंत ही केंद्रपुरस्कृत योजना असून त्यानंतर त्यावरील खर्च राज्य शासनाने करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्रामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना दोन टप्प्यांमध्ये करण्यात आली शासन निर्णय दिनांक १९ जून १९९५ अन्वये १४ जिल्यामध्ये अस्तित्वात असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयांचे उच्चीकरण करून या संस्था निर्माण केल्या.त्यानंतर शासन निर्णय दिनांक ८ आक्टोंबर १९९६ अन्वये निर्माण झालेल्या १५ संस्थापैकी ११ संस्था शासकीय अध्यापक विद्यालयांच्या उच्चीकारणाने निर्माण झाल्या. उर्वरित ४ जिल्यांमध्ये -सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर व गडचिरोली या ठिकाणी शासकिय अध्यापक विद्यालये अस्तित्वात नसल्याने या संस्था नव्याने निर्माण करण्यात आल्या.
केंद्रशासनाच्या निकषनुसार या प्रत्येक संस्थेसाठी दहा एकर शासकीय जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक संस्थेमध्ये सेवापूर्व प्रशिक्षण - प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष डी.एड. प्रतेकी एक व सेवांतर्गत प्रशिक्षण एक अशा किमान तीन तुकड्या असणे आवश्यक आहे. उच्चीकरणाने निर्माण होणार्‍या संस्थांसाठी बांधकामाकरीता ५८ लाख रुपये व साहित्य खरेदीसाठी १३ लाख रुपये इतके अनुदान केंद्रशासणाकडून दिले जाते.तर नव्याने होणार्‍या संस्थांसाठी बांधकामाकरिता १ कोटी रुपये व साहित्य खरेदीसाठी १३ लाख रुपये इतके अनुदान केंद्रशासणाकडून दिले जाते. बांधकामामध्ये प्रशासकीय इमारत, प्राचार्य दालन, कार्यालय, अध्यापक दालन, किमान ३ वर्गखोल्या, सभागृह, प्रयोगशाळा ( विज्ञान व मानसशास्त्र ) कार्यशाळा प्रसाधनगृह-प्राध्यापक,महिला व पुरूष विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सुसज्ज वसतीगृह -महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र, प्राचार्य निवासस्थान व कर्मचारी निवस्थाने आदी बाबी प्रस्तावित आहेत. बांधकामासाठी-उपलब्ध अनुदानासाठी प्रशासकीय मान्यता, मुख्य वास्तुशास्त्रज्ञाने मान्य केलेले बांधकाम आराखडे आदी बाबींची पूर्तता करावी लागते.
या संस्थांमध्ये पूढील चार शाखा निर्माण करण्यात आल्या असून त्यासाठी शैक्षणिक पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्राचार्याचे पद हे शिक्षण उपसंचालक दर्जाचे आहे.

अ.क्र.
शाखा
जेष्ठअधिव्याख्याता म.शि.से.प्रशिक्षण
गट- अ संवर्ग
अधिव्याख्याता म.शि.से.प्रशिक्षण
गट- ब संवर्ग
१.
सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण शाखा
२.
अभ्यासक्रम विकसन व मूलयमापन शाखा
३.
शैक्षणिक तंत्रज्ञान व अनौपचारिक प्रशिक्षण शाखा
४.
नियोजन, व्यवस्थापन व प्रशासन शाखा
एकूण :

उपरोक्‍त ११ शैक्षणिक पदांबरोबर १५ कार्यालयीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामध्ये अधिक्षक (जीएसएस. गट-ब संवर्ग), रोखपाल , लघुलेखक, सांख्यिकी सहा.तंत्रज्ञ, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई आदी पदांचा समावेश आहे.
आस्थापनाविषायक बाबी शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रकअंतर्गत तर आर्थिक, प्रशासकीय व कार्यक्रमविषयक बाबी म.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणाअंतर्गत येतात. नव्याने निर्माण झालेल्या शैक्षणिक व कार्यालयीन पदांपैकी राजपत्रित पदे भरण्याची कार्यवाही शिक्षण संचलनायाकडून तर अराजपत्रित पदे भरण्यची कार्यवाही संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाडून केली जाते. सध्या यवतमाळ, कोल्हापूर, अहमदनगर, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, परभणी, पुणे या संस्था वगळता इतर संस्थांचे प्राचार्य पद रिक्त असून प्राचार्य पद जेष्ठअधिव्याख्याता संवर्गामध्ये काम करणार्‍या गट-अ संवर्गातील व्यक्तिकडे अतिरिक्त कार्यभाराने सोपविण्यात आले आहे. जेष्ठअधिव्याख्याता व अधिव्याख्याता हे दोन्ही गट- अ व ब संवर्गातून बदलीने, जिल्हा परिषद/ खाजगी व्यवस्थापणाच्या /प्राथमिक /माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षाकांमधून प्रतीनियुक्तीने भरण्यात आलेली आहेत. नियमित पदे लोकसेवा आयोगामार्फत भरणे अपेक्षित आहे. त्यासंबंधाने शासकीयस्तरावर कार्यवाही सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेतील 'ट' शाखेकडे आर्थिक व प्रशासकीय बाबींचे नियंत्रण येते, शैक्षणिक बाबींचे मार्गदर्शन व नियंत्रण परिषेदेच्या राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळ या विभागकडून केले जाते. जिल्हा शिक्षण व प्रक्षिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांचे वेतन व वेतनेतर अनुदान, सदिल खर्च व कार्यक्रम खर्च यावरील तरतुद 'ट' शाखेमार्फत सर्व संबंधित संस्थांना उपलब्ध करून दिली जाते. ज्या संस्थांमध्ये सेवपूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या तीनपेक्षा जास्त तुकड्या असतील तेथे जादाच्या तुकड्यांसाठी असणारे कर्मचारी यांच्यासाठी वेतन, वेतनेतर अनुदान यावरील खर्च व कार्यक्रम खर्च यावरील तरतूद 'ट' शाखेमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालकांना वितरीत केली जाते व त्यांच्याकडून ती सबंधित संस्थांना दिली जाते.

परिषदेने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांसाठी पुढील तीन प्रकारचे कार्यक्रम प्रस्तावित केले आहेत. त्याप्रमाणे १९९५ पासून कार्यवाही सुरू आहे.

अ) तीन आटवडे मुदतीने सेवांतर्गत प्रशिक्षण

जिल्हा परिषद/ खाजगी व्यवस्थापनच्या/ शासकीय व पोस्ट बेसिक आश्रमशाळा यामधील इ. १ ते ७ च्या वर्गांच्या शिकविणारे प्राथमिक शाळांना संलग्न इ. ५ वी ते ८ वी च्या वर्गांना शिकविणारे डी.एड. शिक्षक असे दोन प्रकारचे अभ्यासक्रम यामध्ये राबविले जातात. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र प्राथमिक शिक्षकांची शिक्षणधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्याकडुन या वर्गासाठी प्रतिनियुक्ती केली जाते. सेवाजेष्ठटेनुसार प्रत्येक तुकडीसाठी ४० शिक्षक प्रतिनियुक्त करणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्षांमध्ये अशा ९ वर्गाचे आयोजन केले जाते.
प्रत्येक सत्रातील प्रत्येक तुकडीसाठी ४० प्रशिक्षणार्थी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहणे अपेक्षित आहे. व ती जबाबदारी सबंधित शिक्षणधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्यावर आहे. परंतु आता ही तीन आठवडयाची प्रशिक्षणे बंद करण्यात आलेली आहेत.

ब) अल्पमुदतीचे प्रशिक्षण वर्ग - (५ दिवस मुदत)

प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीने २० वर्ग आयोजित करणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाची क्षमता ५० असते व त्यासाठी संस्थेंच्या नियोजनप्रमाणे व्यक्तींना प्रतीनियुक्त करण्याची जबाबदारी शिक्षणधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्यावर असते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेंची कामे

१. औपचारिक शिक्षण पध्दतीतील शिक्षकांना सेवपूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण पुरविणे.
२. अनौपचारिक शिक्षण व प्रौढ शिक्षण यातील निर्देशक व पर्यवेक्षक यांना व्यवसाय पातळीच्या स्तरांचे निरंतर शिक्षण देणे.
३. संस्थानिहाय नियोजन व्यवस्थापन आणि सूक्ष्म स्तरावरील नियोजन याबाबतीत संस्था प्रमुखांचे प्रशिक्षण व उद्बोधन करणे.
४. समाजधुरीण, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व शालेय स्तरावरील शिक्षणावर प्रभाव पडणारे इतर कार्यकर्ते यांचे उद्बोधन करणे.
५. शाळसमूह व जिल्हा शिक्षण मंडळे यांना शिक्षणाच्या तात्विक भागासंबंधी साहाय्य करणे.
६. कृती संशोधन व प्रायोगिक कार्य करणे.
७. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा तसेच अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाचे उपक्रम यासाठी मूल्यमापन केंद्र म्हणून काम करणे.
८. शिक्षक व निर्देशक यांच्यासाठी तज्ञ मार्गदर्शन व अध्ययन केंद्राची सोय करणे.
९. जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्थांना मार्गदर्शक करणे व सल्ला देणे.